Press "Enter" to skip to content

मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक आढावा बैठक संपन्न

१० आॅगस्ट ला चलो रोहा ची हा

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #

मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक आढावा बैठक Zoom मार्फत ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. रोहा तालुक्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेमागील राजकारण दूर होऊन योग्य तो तपास पूर्ण करून गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा व्हावी अशी मागणी सरकारकडे करण्यात येईल. त्याचप्रमाणे पीडित बहिणीचे कुटुंब या संकटकाळात एकटे नसून संपूर्ण समाज त्यांच्या पाठीमागे आहे यासाठी येत्या सोमवारी १० ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यातील समन्वयकांनी पिडीत कुटुंबाला भेट देण्याचे ठरले आहेत.

त्याचप्रमाणे सदर प्रकरण कोणत्याही प्रकारे दडपले जाऊ नये, गुन्हेगारांची नावे तात्काळ जाहीर करावी व अन्य सर्व मागण्यासाठी मराठा समाज आक्रमक होणार आहेत .
याच प्रमाणे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित मराठा आरक्षणाचा विषय सरकारने योग्य पद्धतीने हाताळावा अन्यथा याचे गंभीर परिणाम सरकारला सरकारला भोगावे लागतील हा इशारा सरकारला देण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या लढ्यादरम्यान ज्या आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले होते हे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सरकारने तात्काळ पूर्ण करावी अशा प्रकारची मागणी सुद्धा सरकारकडे करण्यात येणार आहे.

येणाऱ्या शैक्षणिक वर्षाच्या सर्व प्रवेश प्रक्रिया मध्ये 50 टक्के सवलत देऊन प्रवेश देण्यात यावेत अशी सरकारकडे करण्यात येणार आहे.
मराठा समाज हा त्यांच्या मागण्यांसाठी गंभीर असून मराठा समाजाच्या सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा मराठा समाज पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात येईल असा इशारा सर्वसंमतीने सरकारला देण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.