Press "Enter" to skip to content

निसर्गसवर्धन करुन वाहिली मुलाने आपल्या वडिलांना श्रध्दांजली

सिटी बेल लाइव्ह / प्रतिनिधी ( सारडे )

जगात निस्वार्थी समाजसेवा ही श्रेष्ठ आहे आणि त्याग हा तर परमेश्वर पर्यंत नेणारा आहे जग हे अनेक लोकांनी भरलेलं आहे परंतु जो जगात कर्तृत्व गाजवितो तोच खरा स्मरणात राहतो. आपल्या वडिलांनी आपल्यासाठी ज्या ज्या हालअपेष्टा सहन केल्या त्या जरा स्मरून पहा येथेच आपल्याला पंढरी दिसेल. असेच एका सुशिक्षित मुलाने आपल्या वडिलांच्या स्मृती दिनाचे औचित साधून केलं आहे.

स्वर्गीय गोपीनाथ तुकाराम पाटील यांच्या 9 वा स्मृतिदिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विद्याधर पाटील सर यांनी सारडे विकास मंच ने लावलेल्या झाडांच्या बाजुच्या गवताच्या सफसफाईसाठी सारडे गावातील पाच महिलांना सलग तीन दिवस मजूरी ने घेऊन गवताची सफाई करण्याच काम केले आहे.

वडिलांच्या आत्म्यास शांति लाभावी यासाठी सामाजिक कार्य करुन नवीन आदर्श निर्माण केल्याबद्दल विद्याधर पाटील सर यांचे सर्वञ कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.