Press "Enter" to skip to content

गुड फ्रायडे म्हणजे काय ?

काय आहे आजच्या दिवसाचे महत्व…. जाणून घ्या सिटी बेल च्या गुड फ्रायडे विशेष लेखातून..

गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मामधील लोकांचा एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे.ईस्टरच्या आधी येत असलेल्या शुक्रवारी हा दिवस पाळण्याची प्रथा आहे.
बऱ्याच जणांना असे वाटते की ह्या दिवशी सर्व शासकीय अणि खाजगी कार्यालयांना सुट्टी असते.म्हणजे हा ख्रिश्चन धर्मातील लोकांचा एक आनंदाचा सण उत्सव असावा म्हणून काही जण एकमेकांना शुभेच्छा देखील देताना दिसुन येतात पण वास्तव फार निराळे आहे.गुड फ्रायडे हा कुठलाही सण तसेच उत्सवाचा दिवस नाही.हा एक दुखःद दिवस आहे कारण ख्रिश्चन धर्मातील केलेल्या तरतुदी नुसार ह्याच दिवशी येशु ख्रिस्त यांना क्राॅसवर चढवण्यात आले होते.

त्यामुळे ह्या दिवशी ख्रिश्चन धर्मातील लोकांकडुन एक दुखवटा पाळून शोक साजरा केला जातो.अनेक ख्रिस्ती पारंपरिक राष्ट्रांमध्ये हा दिवस राष्ट्रीय दुखवटा म्हणून जाहीर केला जात असतो.

ह्या दिवशी ख्रिश्चन धर्मातील लोक कुठलाही आनंदाचा कार्यक्रम अथवा उपक्रम साजरा करत नाहीत.हया दिवशी सर्व खिस्ती लोक चर्चमध्ये जाऊन प्रभु येशु यांनी केलेल्या बलिदानाकरीता कृतज्ञता तसेच आभार व्यक्त करत असतात.

ख्रिश्चन धर्मात असे सांगितले गेले आहे की प्रभु येशु हे ईश्वराचे पुत्र होते.म्हणुन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते सर्व मानव जातीला अज्ञानाच्या काळोख्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते.लोकांना परमेश्वराचा संदेश देऊन शिक्षित करत होते.सामाजिक प्रबोधन करत होते.पण कट्टर पंथीय लोक प्रभु येशु यांच्या ह्या कार्यात अडथळा निर्माण करू लागतात.त्यांना हे कार्य करण्यासाठी मनाई करतात आपला विरोध दर्शवतात.

त्याकाळी जो रोमन गव्हर्नर होता त्यांच्याकडे काही कट्टर पंथीय विरोधकांनी प्रभु येशु यांची तक्रार केली.प्रभु येशु जो संदेश जगाला देत होते त्याने रोमन साम्राज्यास धोका पोची असे वाटल्याने,आणि यहुदी लोकांना कुठल्याही प्रकारची क्रांती घडवून आणता येऊ नये तसेच रोमन लोकांना आपली सत्ता अबाधित राखता यावी ह्यासाठी त्या काळच्या रोमन गवर्नर याने येशु ख्रिस्त यांना क्राॅसवर फासावर लटकवुन देहांत देण्याचा हुकुम दिला होता.

प्रभु येशु यांना फाशी देताना रोमन सैनिक यांनी चाबुकाने फटके देऊन त्यांची धिंड देखील काढली होती.जेव्हा रोमन सैनिक प्रभु येशु यांना चाबकाने फटके देत होते तेव्हा प्रभु येशु यांचे अनुयायी आक्रोश करत होते अणि क्षमेसाठी याचना देखील करत होते.

पण कर्मठ रोमन सैनिक प्रभु येशु यांनी येशुंची अवहेलना करतच होते. आपल्या मृत्युच्या शेवटच्या क्षणी देखील येशू ख्रिस्त देवाकडे प्रार्थना करीत होते हे परमेश्वरा हया सर्वांना ह्यांच्या केलेल्या कृत्यासाठी क्षमा कर.हे सर्व अज्ञान आहेत ते काय करता आहे याचे त्यांना भान नाही. ते प्रार्थना करीत असताना त्यांना क्रॉस वर लटकवण्यात आले होते.हा दिवस प्रभु येशु यांनी दिलेल्या बलिदानाचा दिवस होता म्हणून ह्या दिवशी सर्व ख्रिश्चन धर्मातील लोक प्रभु येशु यांच्या बलिदानाबददल चर्च मध्ये जाऊन येशूंसमोर हात जोडून कृतज्ञता व्यक्त करत असतात.

पण गुड फ्रायडे नंतर येत असलेला रविवार हा दिवस ईस्टर संडे हा प्रभु येशु यांच्या परत येण्याचा पुन्हा प्रकट होण्याचा दिवस आहे अशी ख्रिश्चन धर्मातील लोकांची मान्यता आहे.म्हणुन हा दिवशी ख्रिश्चन धर्मातील लोक मोठ्या आनंदाने साजरा करत असतात.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.