रोहे-कोलाड मार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात : प्रवास होणार सुखकर
सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार )
कायम रहदारी असणाऱ्या रोहे-कोलाड मार्गावरील पडलेले खडे भरण्याचे आदेश आ. अनिकत तटकरे यांनी दिल्यानंतर या रस्त्याच्या कामांना वेग आला असून,या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.
रोहे-कोलाड मार्गावर पावसामुळे मोठया प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातुन मार्ग काढतांना वाहनचालक व प्रवाशांची अडचण होत असून, किरकोळ अपघात देखील होत असतात. तर या रहदारीच्या मार्गावरून व पुढील कालावधीत येणाऱ्या गणेशोत्सव सणानिमित्त प्रवाशांना हा मार्ग सुखकर व्हावा या उद्देशाने आ.अनिकेत तटकरे यांनी या रस्त्याची पाहणी करून,येथील खड्डे त्वरित भरण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या.
आ. अनिकेत तटकरे यांच्या आदेशाने या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम वेगात सुरू असून,वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून खड्डे भरल्याने सर्वांच प्रवास सुखकर होणार आहे.






Be First to Comment