सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर):
महाड येथून येऊन पनवेल येथे सुमारे 40 हुन अधिक वर्षे प्रॅक्टीस करणारे सीए तसेच पनवेल व महाड कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून सेवा देऊन असंख्य विद्यार्थी घडविणार्या कांतीभाई गुजर (वय-79 वर्षे) यांचे गेले तीन आठवडे आजाराशी झुंज देत असताना पुणे येथे दुःखद निधन झाले.
एक हुशार, अनुभवी चार्टर्ड अकौंटन्ट म्हणून संपूर्ण रायगड जिल्ह्यात ते सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने एक प्रगल्भ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती जयाबेन, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.






Be First to Comment