Press "Enter" to skip to content

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला

शिवसेना उरणतर्फे कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील बेळगाव जिल्यातील मधील माणगुती गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा कर्नाटक सरकारने रातोरात हटविल्याने कर्नाटक सरकारचा शिवसेना उरणच्या वतीने जाहीर निषेध रविवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२० रोजी शिवसेना उरण शहर शाखे जवळ करण्यात आला.
या वेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, मते मागण्यासाठी व सरकार स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करायचा व नंतर त्यांचा अपमान करायचा या भाजप नीतीचा उपजिल्ह्यप्रमुख नटेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी निषेध केला.
यावेळी शहरप्रमुख विनोद म्हात्रे, तालुका संपर्कप्रमुख जे. पी. म्हात्रे, शहरसंपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, ग्रा. स. कक्ष जिल्हाप्रमुख रमेश म्हात्रे, अ. वा. सेना तालुका अध्यक्ष चेतन म्हात्रे, शहर संघटक दिलीप रहालकर, उपतालुका संघटक के. एम घरत, उपशहर प्रमुख अरविंद पाटील, गणेश पाटील, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, नगरसेवक समीर मुकरी, नगरसेविका सौ. वर्षा पाठारे, महिला संपर्कप्रमुख सौ. श्रध्दा सावंत, श्रीमती वंदना पवार, शहर संघटक सौ मेघा मेस्त्री, माजी शहर प्रमुख सुजन शिरधनकार ,विभाग प्रमुख एस. के. पुरो, संदेश पाटील, अश्विन गवस, गणेश शेलार, संजय गावंड, विकास कडू, विक्की म्हात्रे, रुपेंद्र गुडेकर युवा सेना शहर प्रमुख नयन भोईर, भारत पाटील, बंड्या व शिवसैनिक
सोशल डिस्टन्स या नियमाप्रमाणे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.