सिटी बेल ∆ वहाळ ∆ सुनिल ठाकूर ∆
साईं देवस्थान साईं नगर वहाळ श्री साईं बाबा मंदिराचा 11 वा वर्धापन दिन आज गुढी पाडवा दिवशी मोठ्या उत्सहात साजरा झाला.
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 6 वाजता श्री स्नेहींत एकनाथ ठाकूर (चिरले )यांच्या हस्ते बाबांचे मंगल स्नान .सकाळी 7 वाजता महाआरती व साईं बाबा अष्टोत्तर शत. नामावली जप वाचन श्री सुयोग खरे, एकनाथ ठाकूर जगदीश पारिंगे, सदानंद कडु सौ .राजेश्री मुंबईकर, सकाळी 10 ते 12 गुरुकृपा प्रासादिक भजन मंड़ळ कोपर यांचे भजन, गायिका सौ .सुप्रिया घरत .पखवाज तुषार घरत (चिरले ).तबला मिलिंद कडू (तळोजे ).उमेश गावंड (बोरखार ).
दुपारी 12 वाजता बाबांची मध्यान्ह आरती दुपारी 12, 30 वाजता महाप्रसाद अन्नदाते देवस्थान चे अध्यक्ष श्री रविशेठ पाटील, सायंकाळी 12 ते 4 आरोग्य शिबीर सोबत गायक नाना गडकरी यांच्या सुमधुर गायनाचा कार्यक्रम .
सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ भैरवी देवीआध्यात्मिक सेवा मंडळ केळवणे यांचे हरिपाठ कोरस सद्गुरू माउली हसुराम बाबा यांचे शिष्यगण सायंकाळी 6 वाजता बाबांची धुपारती सायंकाळी सात वाजता बाबांचा पालखी सोहळा यामध्ये संस्थापक कै, वामन बुवा कडु याचे रत्नेश्वरी साईं प्रेरना भजनाने टाल मृदुंगाच्या गजरात आतष बाजीने साईं पालखी च्या सोहळ्या ने सांगता झाली
आज गुढी पाडवा दिवशी मंदिरात दर्शना साठी मान्यवरां सह साईं भक्तांची मांदियाळी दिसून येत होती.
यामध्ये एन .आर .आय .सागरी पोलीस ठाण्याचे माजी .वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रवींद्र पाटील … जि. प सदस्य रविंद्र पाटील, माजी जि प सदस्या सौ. पार्वती ताई पाटील, जगन शेठ पाटील अनंत पाटील, रोटरी क्लब ऑफ उलवे अध्यक्ष श्री शिरीष कडू .विश्वास पाटील .श्री बालाराम पाटील .अरुण दापोलकर, जगदीश पारिंगे गणेश पाटील .रामदास नाईक, धनंजय घरत, रायगड भूषण राजू मुंबईकर,वैजनाथ मुंबईकर, श्रीकांत मुंबईकर, एकनाथ ठाकूर .सदानंद कडू .राजू पाटील आदी सह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे शानदार निवेदन श्री मो. का. मढवी यांनी केले.
Be First to Comment