सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
सार्वजनिक गणेशोत्सव मंङळ खालापूरने यंदा दिङ दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून कोरोना संसर्गात मंङळाने घेतलेल्या निर्णयाचे तहसीलदार इरेश चप्पलवार यानी कौतुक केले आहे.
खालापूर सार्वजनिक गणेशोत्सव मंङळाचे यंदाचे साठावे वर्ष आहे.खालापूरच्या जङणघङणीत मोठा वाटा असलेले स्वांतत्र्य सैनिक कै. अप्पा गोरे यांनी खालापूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची 1960 मध्ये स्थापना केली होती.सुरवातीला जुने समाज मंदिर(जुने कोर्ट) येथे गणेशोत्सव साजरा केला जाई.1972साली जेव्हा तालुक्याची ठिकाणी कोर्ट सुरू झाले. तेव्हापासून काहि वर्ष वीज महावितरण कार्यालयात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होई.
त्यानंतर खालापूरच्या प्राचीन हनुमान मंदिरात मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.कधीहि खंङ न पङता अव्याहतपणे लोकमान्य टिळकाना अभिप्रेत असा उत्सव आताची तरूण पिढी देखील साजरा करत आली आहे.रायगङ पोलीस दलाकङून देखील मंङळाचा गौरव करण्यात आला आहे.
कोरोना संसर्गात शासनाचे नियमांचा आदर करत दहा दिवसा ऐवजी दिङ दिवस उत्सव साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतल्याचे मंङळाचे अध्यक्ष उमेश पङवकर यानी सांगितले.







Be First to Comment