Press "Enter" to skip to content

रायगड छात्रभारतीचे मा.जिल्हाधिकाऱ्यांना पत्र..

२५ नवीन इमारती बांधणे व २० अंगणवाड्याचें नुतनीकरण करण्याची मागणी

कर्जत तालुक्या मध्ये 336 अंगणवाड्या आहेत . त्यात १९ हजार बालक पोषण आहार घेण्यासाठी येत असतात . काही अंगणवाड्या ३० वर्षापुर्वीच्या असल्याने त्या आता जीर्ण झालेल्या आहेत त्यांचे नुतनीकरण करणे गरजेचे आहे अशा २० अंगणवाड्या आहेत ज्यांचे तातडीने नुतणीकरण होणे आवश्यक आहे तर २५ अंगणवाड्या या स्वतःच्या इमारती नसल्याने खाजगी जागांमध्ये भरवल्या जात आहेत.
त्यासाठी तातडीने २५ नवीन इमारती व २० अंगणवाड्याचें नुतनीकरण करून घ्यावे अशी विनंती रायगड छात्रभारतीचे अध्यक्ष जितेश किर्दकुडे यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना पत्रा द्वारे केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.