कोकणात शेकडो व्यवसायिक उभे रहावेत यासाठी सहकार्य करणार : रामदास कदम
सिटी बेल ∆ खेड ∆
कोकणात शेकडो व्यवसायिक उभे रहावेत यासाठी सहकार्य करणार, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम यांनी येथे केले. खेडमध्ये व्यवसाय सल्ला व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री रामदास कदम यांच्याहस्ते झाले. यावेळी उपस्थितांसोबत ते बोलत होते.

आशिया खंडातील सर्वात यशस्वी व प्रभावी व्यवसाय प्रशिक्षक व प्रेरणादायी विचारवंत डॉ.विवेक बिंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली नव उद्योजक व उद्योजक यांना व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण बाबत मार्गदर्शन देऊन मदत करण्यासाठी पत्रकार अनुज जोशी यांनी खेड येथे पुढाकार घेऊन व्यवसाय सल्ला व मार्गदर्शन केंद्र उभारले असून त्याचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याहस्ते झाले.
यावेळी ब्रह्माकुमारी गीता बहेन, ब्रह्माकुमारी श्वेता बहेन, अनंत जोशी, अंजली जोशी, स्वरा जोशी, माजी जिल्हापरिषद सदस्य अरुण कदम, शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे, जावेद कौचाली, रामचंद्र आयीनकर, दाऊद दुदुके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कदम म्हणाले, कोकणात जास्तीत जास्त तरुणांनी स्वतःचे व्यवसाय सुरू करावेत व जे व्यवसाय करत आहेत त्यांना त्याच्या व्यवसायाच्या वृध्दीसाठी पूर्णपणे मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. या केंद्राचा उपयोग होईल, असा विश्वास यावेळी माजी मंत्री रामदास कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

Be First to Comment