सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
पाऊसाच्या आगमनाबरोबर जंगल भागात विविध रानभाज्या हमखास मिळतात.तर श्रावण महिन्यात दुर्मिळ असणारी व आयुर्वेदिकद्रुष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी करंटोळीच्या रानभाजीला सध्या मोठी मागणी मिळत असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या या शरीरास पोषक,चवदार व आयुर्वेदिकद्रुष्टीने महत्त्वाच्या समजल्या जात असल्याने या दिवसात या भाज्यांना फार मोठी मागणी असते.तर शहरातील रहिवासीवर्ग वेळप्रसंगी जादा दाम देऊन शरीराचे पोषणासाठी या भाज्यांची हमखास खरेदी करताना दिसून येतात.विविध रानभाज्यांमध्ये श्रावण महिन्याच्या आगमनाबरोबरच बाजारात विक्रीला येणारी करंटोळीची रानभाजी मात्र या मोसमात च़ांगलेच भाव खाऊन जाते.चवीला कारळ्याच्या भाजीप्रमाणे थोडीशी कडवट असल्याने या भाजीच्या कडवट गुणामुळे शहरातील रहिवासी वर्ग ही भाजी हमखास खरेदी करतात.तर आयुर्वेदिक तज्ञांचे मते करंटोळीची रानभाजी म्हणजे पोट व आतड्यांचे विकार यांच्यासाठी फायदेशीर ठरते.तसेच शुगर असणाऱ्या व्यक्तिंना तर या भाजीचा फार मोठा लाभ होत असल्याचे या भाजीला श्रावण महिन्यात मोठी मागणी असते.
सध्या कोरोना महामारीमुळे प्रत्येकाला विविध आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असतानाच दुर्गम भागातील आदिवासी बांधव देखील यामधून सुटले नाहीत.तर विविध रानभाज्यांसह करंटोळी रानभाजी विकून व बाजारात मिळेल तिथे विक्री करून आदिवासी बांधवांनी आपल्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविला आहे.






Be First to Comment