सहा महिन्यांपूर्वी ताटातूट झालेल्या मायलेकांची घडवून आणली रेवदंडा पोलीसांनी भेट
सिटी बेल लाइव्ह / रायगड : अमूलकुमार जैन #
मुरूड तालुक्यातील मांडला येथे एक वृद्ध महिला फिरत असल्याची माहिती रेवदंडा पोलीस ठाण्याकडील बिट मार्शल कर्मचारी पोलीस शिपाई,चोरगे,पोलीस शिपाई मल्लाव, व दामिनी पथक महिला पोलीस नाईक भोईर,महिला पोलीस शिपाई पाटील,आदी जण मांडला या गावी जाऊन सदर महिलेस रेवदंडा पोलीस ठाण्यात आणले.
रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी सदर महिलेच्या संदर्भात विचारपूस तसेच पोलीस हवालदार संतोष गायकवाड, पोलीस नाईक भोईर, महिला सहाय्यक फौजदार गोसावी महिला पोलीस नाईक पुळेकर,, पोलीस शिपाई म्हात्रे आदींनी सदर महिलेकडे तिला विश्वासात घेऊन आस्थेपूर्वक चौकशी केली.
सदर महिला हिने चौकशी दरम्यान सांगितले की,सदर महिलेचे नाव प्रतिमा प्रकाश घाग राहणार-वाकीपाडा, वसई असे सांगितले. रेवदंडा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार तसेच र, महिला सहाय्यक फौजदार गोसावी,महिला पोलीस नाईक पुळेकरयांनी पालघर जिल्हा कंट्रोल रूम येथे संपर्क साधत वसई पोलीस ठाण्याचा नंबर प्राप्त करीत सदरची माहिती दिली असता त्यांच्याकडून संबधीत वाळीव पोलीस ठाण्याचा नंबर घेतला.
सदर महिला फेब्रुवारी2020 पासून बेपत्ता असल्याबाबत कळवून सदर महिलेच्या मुलाचा नंबर प्राप्त करीत त्यास संपर्क साधून त्यास रेवदंडा पोलीस ठाण्यात बोलवून घेतले आणि सहा महिन्यांपासून आई मुलाचा तुटलेला संपर्क साधून दिला.रेवदंडा पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे






Be First to Comment