गलवान संघर्षात निकृष्ट वाहनांमुळे चिनी सैनिकांचा बळी
कुछ तो गडबड है दया
सोशल मिडिया वर पोस्ट टाकणाऱ्या नागरिकाला तातडीने अटक.
सिटी बेल लाईव्ह Exclusive
लष्करी वाहनांचा खराब दर्जा तसेच अंतर्गत भ्रष्टाचारामुळे सीमेवर भारतीय जवानांविरुद्धच्या संघर्षात आपले सैनिक मारले गेले असा खळबळजनक दावा ऑनलाईन माध्यमावर करणाऱ्या एका चिनी नागरिकाला अटक करण्यात आली. ऑनलाईन माध्यमातून अफवा पसरविल्याचा आरोप पोलिसांनी त्याच्यावर ठेवला.
पीपल्स लिबरेशन आर्मीच्या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळावर संक्षिप्त वृत्त देण्यात आले आहे. त्यानुसार झोऊ लियींग असे त्याचे नाव आहे. त्याने म्हटले होते की, डाँगफेंग ऑफ-रोड व्हेइकल ही कंपनी लष्कराला वाहने पुरविते.
त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या वाहनांमुळे फटका बसला.उभय देशांचे सैनिक १५ जून रोजी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात आमनेसामने आले होते. भारताने २० जवान हुतात्मा झाल्याचे म्हटले आहे, चीनने मात्र कोणत्याही हानीचा तपशील अद्याप जाहीर केलेला नाही.परंतु चीन मध्ये हा तपशील कितीही झाकला तरी उघडा पडायचा रहात नाही.मागे ठार झालेल्या चिनी सैनिकांच्या कुटुंबीयांनी शहीद दर्जा देण्याची मागणी केली तेव्हाच चीन्यांचे चपटे नाक ठेचले गेले होते.चिनी माध्यमांनी राळ उठवली नसली तरी शंभर पेक्षा अधिक चिनी आपण मारले असल्याचे वृत्त आहे,झोऊ लियींग याच्या अमृताने शूर भारतीय सैनिकांचा पराक्रम अधिकाधिक उजळ होत आहे.


Be First to Comment