जीव गेल्यावर खड्डे भरले जातील का ? नागरिकांचा संतप्त सवाल
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
रोहा कोलाड मार्गाची सुरवातीच्या पावसातच दैना अवस्था उडाली असून अक्षरशः चालन झाली असून हा मार्ग जणू मृत्यूचा मार्ग बनला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे तसेच नागरिकांचा खड्डयांतून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या जिव्हाळा मोठा धोका निर्माण झाला आहे.
जून महिन्यात कोसळलेल्या पावसात या मार्गाची मोठी दयनीय अवस्था उडाली होती त्यातच भरीत भर म्हणून गेली तीन चार दिवस पडलेला मुसळधार पाऊस यात तर काही रस्ताच वाहून गेल्यागत त्यामुळे वाहन चालकांची वाहन चालवताना मोठी दमछाक होत असून त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तसेच वहाने चक्क हेलकांडे घेत आहेत तर रोहे नगरीच्या नजीकच्या वरसे स्टॉप ते कोलाड हा रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला आहे तर मुबंई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्याच्या भर चौकात मुख्यरहदरीच्या ठिकाणी गटार लाईच्या कामासाठी रस्ता खोदले असल्यानं या ठिकाणी या कामाची दिरंगाई प्रवासी वर्गाला धोकादायक ठरत आहे.
या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच अनेक दिवसांपासून या मार्गावरील एच पी पेट्रोल पंप समोर ,एक्सल स्टॉप,जैन वाडी स्टॉप,धाटाव,मोरे वसाहत,सुदर्शन, बारसोळी, किल्ला,कृषी विद्यापीठ, पाले ,संभे,या ठिकाणी हे खड्डे मोठे आपघाच्या खुणा करीत आहेत तर वरसे ते आंबेवाडी या दरम्यान रस्तात खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे हे चालकांच्या लक्षातच येत नाहीत. तसेच आंबेवाडी नजीक एम आर टायर्स समोरील रस्त्याचा काही भाग पडलेल्या मुसळधार पावसात वाहून गेला त्यामुळे आपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेली अनेक दिवसांपासून पडलेले हे धोकादायक खड्डे दिवसंदिवस प्रवाशीनागरिकांच्या जीवावर बेतले असल्याचे दिसून येत आहेत.
औद्योगिक क्षेत्रात रोजंदारी साठी येत असणाऱ्या कामगारांना हे खड्डे धोकादायक तर मागील तीन दिवसात दोन विचित्र आपघात. या मार्गावरून प्रवास करतांना एम आय डी हद्दीत कामावर ये जा करत असलेल्या कामगारांसह प्रवाशांना आपला जिव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. तर या मार्गावरून प्रवास करतांना या खड्यांचा अंदाज न आल्याने मागील तीन दिवसात दोन दुचाकी चालकांचा विचित्र आपघात झाल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली असल्याचे संकेत मिळत आहेत. या भयानक पडलेल्या खड्यांमुळे प्रवाशी वर्गाच्या जिवाचा जणु खेळ चालला असल्याचे दिसत आहे. या मार्गावर शाळा कॉलेज,धाटाव एम आय डी सी,तहसिलदार ऑफीस, दवाखाने,व रोहा कोलाडसारखी मोठी बाजापेठ असल्याने या मार्गावरुन दररोज असंख्य नागरिक प्रवास करीत असतात. औद्योगिक क्षेत्रात ये जा करीत असलेल्या नागरिकांना प्रवास करतांना या खड्यांचा मोठा धोका होत असल्याचे दिसत आहे.तर टूव्हीलर वरुन प्रवास करतांना या खड्डयातुन प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तर कामावर जाणारा कामगार या खड्डया मुले वेळेवर कामावर पोहोचेल याची खात्री देता येत नाही.या मार्गाची डागडुजी मागील वर्षी केली परंतु पाऊस पडताच या मार्गावर जणु खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले पावसाच्या पाण्याने खड्डे भरल्यामुळे दिसेनासे होत आहेत त्यामुळे या मार्गावर छोटे मोठे अपघात होत असतात यामुळे प्रवाशी वर्गाच्या जिवाला नेहमी धोका निर्माण होतो.
यामुळे संबंधितानी याकडे लक्ष देऊन या रस्त्याचे काम करावे अथवा तात्पुरता याची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.
खड्डयांमुळे मोठा धोका दुरुस्तीची मागणी
रोहा कोलाड मार्गावर या खड्यांमुळे मागील आठ दहा दिवसांपूर्वी तीन चार किरकोळ आपघातखड्यांमुळे मागील आठ दहा दिवसांपूर्वी तीन चार किरकोळ आपघात झाले तद्नंतर पुन्हा या तीन दिवसात दोन विचित्र आपघात झाले आहेत गेली अनेक दिवसांपासून रोहा कोलाड मार्गावर पडलेले हे खड्डे दिवसंदिवस धोकादायक ठरत असून मुसळधार पाऊस झाल्याने यात आणखी या रस्त्याची अवस्था गंभीर झाली असल्याने सर्वत्र भीती व्यक्त केली जात आहे . तर काही ठिकाणी रस्ता वाहून गेला असून जागो जागी दोन ते तीन फूट खोलीचे हे खड्डे पडले आहेत तर वरसे कोलाड दरम्यान पडलेल्या खड्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अथवा प्रवाश्याचे जीव गेल्यानंतर या खड्डयांची दखल घेतली जाईल का अशी विचारणा प्रवाशी व वाहन चालक वर्गातून केली जात आहे.






Be First to Comment