Press "Enter" to skip to content

मार्केट डाऊन असल्याने पेण बाजारपेठेत लिंबाचे भाव घसरले

दहाला दोन मिळणारे लिंबू आत्ता दहाला दहा 

सिटी बेल लाइव्ह / पेण-(प्रशांत पोतदार)

पेण तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉक डाऊनमध्ये सर्व व्यवसाय धंदे ठप्प झाले.लॉक डाऊन मध्ये जीवनावश्यक वस्तुंची जरी दुकाने उघडण्यास प्रशासनाकडून संमती मिळत होती तरी ही या काळात पेण मधील भाजी व्यवसायावर लॉक डाऊनचा मोठा परिणाम दिसून येत होता. जिल्हाबंदी तसेच वाहतूक बंदीमुळे भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला होता.त्यामुळे पेण तालुक्यात भाज्यांचे भाव कडाडले होते. त्यातच कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सी जीवनसत्व मिळणाऱ्या फळांच्या किंमतीत ही कमालीची वाढ झाली होती.सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे लिंबूही या काळात दहाला दोन ते तीन असे विकले जात होते परंतु आता पेण बाजार पेठेत भाजीपाला तसेच फळे यांची आवक वाढलेली दिसून येत आहे मात्र आवक वाढूनही भाज्यांना पाहिजेत तसे ग्राहक नसल्याने भाजी विक्रेता हवालदिल झाला आहे.

ग्राहक नसल्याने भाजी तसे फळांचे भावही स्थिरावले आहेत.पेण बाजार पेठत दहा रुपयाला दोन ते तीन मिळणारे लिंबू आता मात्र मार्केट डाऊन असल्याने दहा रुपयांना दहा असे लिंबू विकले जात असल्याचे विक्रेता सांगत आहे तर लिंबाचे भाव घसरल्याने ग्राहकही मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.