चंदरगाव विभागातील रस्त्यांची दुरुस्ती करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन – मनसे विभाग अध्यक्ष केवल चव्हाण यांचा इशारा

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत)
सुधागड तालुक्यातील अनेक गावे, आदिवासी वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. नव्याने डांबरीकरण झालेल्या रस्त्याची देखील पुरती वाट लागली आहे. मुसळधार पावसामुळे चोपडेवाडी गावाजवळील रस्ता खचला असुन तेथे भला मोठा खंडा पडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ढोकळेवाडी फाटा ते चंदरगाव रोड खंड्यामध्ये आहे.अनेकदा पत्रव्यवहार व मागणी करून देखील शासन प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे.
हा मार्ग लवकर दुरुस्त करून ठोस उपाय करण्यात यावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शनिवारी (8) मनसे विभाग अध्यक्ष केवल गणपत चव्हाण यांनी दिला आहे. या मार्गालगत असलेल्या गावात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. त्यामुळे दळणवळण व वाहतूक करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
शिवाय धोकादायक मार्गावरून जीवघेणे अपघात होण्याची देखील भीती आहे. खचलेल्या व खराब रस्त्यामुळे येथून प्रवास करणे अवघड झाले आहे. तसेच अपघात होण्याचा देखील धोका असल्याचे केवल चव्हाण यांनी सांगितले.






Be First to Comment