Press "Enter" to skip to content

के.एम.सी.महाविद्यालयात एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने वृक्षारोपण


सिटी बेल लाइव्ह / रोहा/समीर बामुगडे #

खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.एम.सी. महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग (एन.एस.एस.) आणि एच.डी.एफ.सी. बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.८ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १० वाजता वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

खोपोली नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, महाविदयालयाचे उपाध्यक्ष राजेश अभाणी, प्र.प्राचार्य डॉ.एम.बी. खानविलकर आणि एच.डी.एफ.सी. बँक खोपोली शाखेचे मॅनेजर श्री.महेश लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी नवभारत व नवराष्ट्र चे प्रतिनिधी मुकुंद बेंबडे, तसेच एच.डी.एफ.सी. बँकेचे असिस्टंट मॅनेजर संदीप कारके, संदेश समध्या, पूनम शिवदे, ऋषीता दळवी, अनिकेत देशमुख, प्रवीण कावळे आदी मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या परिसरात 50 वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आला.

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची ची आजची गरज लक्षात घेऊन तरुणवर्गाने, युवापिढीने हे व्रत जोपासण्याचे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा.सुदाम भिसे, कार्यक्रम अधिकारी डॉ.विलास मगर, प्रा.नागोराव तारु व एन.एस.एस.च्या स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.