सिटी बेल ∆ रसायनी ∆ प्रतिनिधी ∆
रसायनी मोहोपाडा येथील पत्रकार राकेश काशिनाथ खराडे यांचे बंधु विशाल (पिंटया) काशिनाथ खराडे (वय 35) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मोहोपाडयातील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी सामाजिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विशाल (पिंट्या)यांचा साधा, सरळ व मनमिळाऊ स्वभाव होता.त्याची परिसरात पिंट्या नावाने ओळख होती.त्याचा दशक्रिया विधी श्री क्षेत्र गुळसुंदे येथे झाला असून उत्तरकार्य मोहोपाडा येथील राहत्या घरी होणार आहेत.
विशालच्या अचानक जाण्याने खराडे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून शिवनगर व मोहोपाडा परिसरातही हळहळ व्यक्त केले जात आहे.त्याच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.

Be First to Comment