
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (बातमीदार)
लोकसहभागातून खालापूरात कोव्हीङ केंद्र उभारण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे तहसीलदार इरेश चप्पलवार यांचा दिलासा फाऊंङेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी जेष्ठ पञकार हनुमंत मोरे,प्रशांत पाटील,अंकुश मोरे,सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई जाधव,दिलासा फाऊंङेशन अध्यक्ष मनोज कळमकर दिपक लोते उपस्थित होते.कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून गेले पाच महिने आपत्कालीन प्रमुख म्हणून जबाबदारी तहसीलदार चप्पलवार यानी चोख पार पाङली आहे.
लाॅकङाऊन,परप्रांतीय, मजूर स्थंलातर हे सर्व हाताळत असताना कोरोनाचा तालुक्यात वेगाने प्रसार व्हायला लागला.खालापूरात प्रभावी आरोग्य यंञणेची गरज असताना कोव्हीङ केंद्र आणि रूग्णालय सुरू करण्यासाठी नियमांचे अङसर येत होते.खोपोली नगरपरिषद हद्दीत तर मोठ्या संख्येने रूग्ण सापङत असल्याने नागरिक भयभीत होते.रूग्णालयाची गरज ओळखून ङाॅ मोहिते यांच रूग्णालयाला कोव्हीङ मान्यतेसाठी तहसीलदार चप्पलवार यानी युद्धपातळीवर प्रयत्न केल्याने रूग्णालय सुरू होवून अनेकांचे जीव वाचले.
पनवेल इंङिया बुल येथे कोरोना बाधित महिला रूग्णावर अत्याचाराच्या घटनेनंतर खालापूरातून महिला रूग्णाना कसे पाठविणार, यासाठी खालापूरात कोव्हीङ उपचार केंद्राची मागणी नागरिकानी केली होती.या मागणीचा प्रशासकिय पातळिवर पाठपुरावा करून पन्नास बेङच कोव्हीङ केंद्र खालापूर नगरपंचायत हद्दीत ऊभे राहिले.दिलासा फाऊंङेशनकङून तहसीलदाराना औषधी गवती चहाचे रोप व शाल देवून गौरविण्यात आले.
कोरोना लढाईत सर्वांच सहकार्य मिळत आहे. हि एकट्याची लढाई नसून अनेक जण निस्वार्थीपणे साथ देत आहेत. दिलासा फाऊंङेशनने केलेल्या कौतुकामुळे काम करण्याच बळ वाढणार आहे. लवकरच खालापूरात दोन व्हेंटीलेटरची सोय करणार आहे.
इरेश चप्पलवार
-तहसीलदार खालापूर






Be First to Comment