सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
भाजपच्या मोदी सरकारच्या देशघातकी, कामगार विरोधी आणि जनविरोधी धोरणांचा निषेध करून कामगार कष्टकरी जनतेला दिलासा मिळवून देण्यासाठी जनसंघटनांतर्फे ९ ऑगस्ट २०२० देशभर जोरदार निदर्शने करण्याची हाक दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार दि. ९ ऑगस्टला २० रोजी सकाळी ११.०० वा. कामगार भवन बोकडविरा समोर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व सभासदांनी उपस्थित राहावे ही विनंती. मागण्यांचे निवेदन तहसीलदार उरण यांना सोमवार दि १० ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे. अशी माहिती भूषण पाटील, मधुसूदन म्हात्रे सी. आय. टी. यु., संजय ठाकूर, रामचंद्र म्हात्रे किसान सभा,अमिता ठाकूर ज्योती म्हात्रे जनवादी महिला संघटना, दिनेश म्हात्रे, राकेश म्हात्रे डी. वाय. एफ. आय. यांनी दिली






Be First to Comment