सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)
उरण येथील द्रोणागिरी नोड सेक्टर – ५० ,प्लॉट न.१०२ येथील साई रेसिडेन्सी या इमारती मधिल रहिवाशी, नवीमुंबई पोलिस दलात मुख्यालय अंतर्गत उरण तालुक्यातील बोरखार येथील सैनिक स्कूलमध्ये पोलिस संरक्षण गार्ड प्रमुख म्हणून कर्तव्यावर आलेले भास्कर पांडुरंग बोंबले(५२)यांचे काल वाशी येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या दुःखद निधनाची बातमी समजताच उरण तालुक्यात सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त करण्यात येत आहे.अचानक काळाने घाला घातल्याने भास्कर बोंबले यांच्या कुटुंबियाचा कर्ता पुरुष हरपल्याने त्यांची पत्नी,मुलगी आणि मुलगा यांच्यावर शोककळा पसरली आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर – खेड तालुक्यातील वेताले गावचे मूळ रहिवाशी असलेले हवालदार बोंबले यांनी मागील २५ वर्षात उरण, न्हावाशेवा व सीबीडी या तीन पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना माणुसकीच्या स्वभावामुळे अनेक अधिकारी व सहकाऱ्यांशी आपुलकीचे सबंध निर्माण केले होते. त्यांच्या जाण्याने सहकार्यानी शोक व्यक्त केला आहे.






Be First to Comment