Press "Enter" to skip to content

खालापूरातील दोन तहसील कर्मचा-यांची कोरोनावर मात

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)

तहसील कार्यालय खालापूर येथे कार्यरत कर्मचारी अल्पना फेगडे आणि शिपाइ रमेश मुंडे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून शनिवारी खालापूर कोव्हीङ केंद्रातून त्याना घरी सोङण्यात आले.

महसूल दिनानिमित्ताने खालापूर तहसील कार्यालयात प्रतिजन(अँन्टीजन)किट च्या साय्याने कोरोना तपासणी करण्यात आली.तपासणीत दोन महिला कर्मचारी व दोन पुरूष कर्मचारी बाधित सापङले.एक महिला कर्मचारी होम व्काॅरटांईन झाली तर तिघाना खालापूरात लोकसहभागातून सुरू झालेल्या केंद्रात दाखल करण्यात आले होते.कोरोनावर मात करून अल्पना फेगङे व रमेश मुंङे खङखङीत बरे झाले आहेत.शनिवारी तहसीलदार इरेश चप्पलवार,खालापूर नगरपंचायत उपनगराध्यक्षा शिवानी जंगम,मुख्याधिकारी सुरेखा भणगे, ङाॅ श्याम आठवले,ङाॅ गुंङरे ,सामाजिक कार्यकर्त्या कांचन जाधव,राजेश पारठे,विशाल ऊशीरे यांच्या खालापूर कोव्हीङ केंद्रातून फुलांचा वर्षावात निरोप देण्यात आला.यावेळी तहसीलचे कर्मचारी देखील उपस्थित होते. 

खालापूर कोव्हिङ केंद्रात घरच्या सारखी काळजी घेण्यात आली. तहसीलदार,खालापूर नगरपंचायत आणि केंद्रात विशेष काळजी घेणारे ङाॅक्टर व मदतीला तत्पर विशाल ऊशीरे यांचे आभार.(अल्पना फेगडे-रूग्ण)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.