सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
रोहे तालुक्यातील देवकान्हे गावच्या रहिवासी वनिता रघुनाथ मोहिते यांचे बुध.दि.५ आँगस्ट रोजी वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने राहत्या घरी दु:खद निधन झाले.
वनिता मोहिते या सर्वांशी मिळून मिसळून वागणा-या व अत्यंत प्रेमळव्रुत्तीच्या होत्या.सध्या जगभर कोरोना महामारीने थैमान घातले असल्याने सामाजिक सुरक्षिततेचे द्रुष्टीने मोहिते परिवारातील आप्तस्वकीय, मित्र परिवार व देवकान्हे ग्रामस्थ यांनी सामाजिक सुरक्षिततेचे भान ठेऊन वनिता मोहिते यांचे अंत्यविधी उरकण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी शुक्र. दि.१४ आँगस्ट तर अंतिम धार्मिकविधी सोम.दि.१६ आँगस्ट रोजी देवकान्हे निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय यांच्याकडून देण्यात आली आहे.






Be First to Comment