सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆
ज्येष्ठ पत्रकार माधव बाबू पाटील यांच्या मातोश्री तुळसाबाई बाबु पाटील यांचे रविवारी (दि. ३० ऑक्टोबर) अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९३ वर्षाच्या होत्या.
तुळसाबाई पाटील यांच्या पार्थिवावर बामणडोंगरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेस सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वारकरी पत्रकारिता, वैद्यकीय, विधी आदी क्षेत्रातील मान्यवरांसह पंचक्रोशीतील नागरिक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुळसाबाई प्रेमळ आणि हसतमुख स्वभावाने परिचित होत्या. त्यांचा होम विधी मंगळवार दिनांक ०१ नोव्हेंबरला बामणडोंगरी येथील राहत्या घरी, दशक्रिया विधी मंगळवार दिनांक ०८ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र लांगेश्वर मोरावे येथे तर उत्तरकार्य शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबरला बामणडोंगरी निवासस्थानी होणार आहे.
Be First to Comment