सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ९ जण सापडले आहेत. तर २२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज एकूण पॉझिटीव्ह ९६८, उपचार करून बरे झालेले ८२१, उपचार घेणारे ११२, मयत ३५ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज बोरी १, बोकडविरा १, दिघोडे १, मोरा कोळीवाडा १, श्रीयोग सोसा. करंजा १, धाकटी जुई १, जेएनपीटी १, वेश्वि १, आचल निवास रांजणपाडा जेएनपीटी १ असे एकूण ९ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर नवापाडा करंजा १, फुंडे २, कोंढरीपाडा करंजा १, रांजणपाडा जासई १, डोंगरी १, जेएनपीटी टाऊनशिप २, धुतूम १, चिरनेर १, उरण ४, आवरे १, जसखार १, बोकडविरा १, केगाव १, पंचवटी करंजा १, चिरनेर २, डोंगरी १ असे एकूण २२ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
पॉझिटीव्हचा आकडा कमी होऊन उपचार घेऊन बरे होण्याचा आकडा वाढू लागल्याने उरणकरांत समाधान व्यक्त केले जात आहे.






Be First to Comment