Press "Enter" to skip to content

खालापूरात अजगराचे गणेश मूर्तीवर ठाण : सर्पमिञानी दिले जीवनदान

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)

कोरोनामुळे माणस घराबाहेर पङण्यास मर्यादा आल्या असल्या तरी प्राण्यांचा मुक्त संचार सुरू असून खालापूरात अजगरानी चक्क गणेश कला केंद्रात मूर्तीच्या मुकूटावर मुक्काम ठोकला.

देवन्हावे हद्दीत सतीश लखीमले यानी शनिवारी  नेहमीच्या सवयी प्रमाणे शटर  उघडले असता त्यांना एका गणेशाच्या मूर्तीवर झाकलेल्या प्लॅस्टिकच्या कव्हर खाली काहीतरी हालचाल जाणवली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले  असता चक्क अजगर जातीचा साप  गणेश मूर्तीच्या मुकुटाच्या जागी वेटोळे घालून बसला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी खालापूर तालुक्यातील सर्पमित्रांच्या टीममधील चेतन चौधरी यांना सर्व माहिती दिली. सर्पमित्र चेतन चौधरी यांनी संदेश चौधरी यांच्या साहाय्याने त्या अजगराला  मूर्तीवरून सावधानतेने बाजूला करून ताब्यात घेतले. 

तो साधारण ४ फूट लांबीचा असल्याचे आढळून आले. सर्पमिञ चेतनने अजगराला सुरक्षित वनक्षेत्रात सोडून दिले आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.