दहिवली जिजामाता उद्यान ते दहिवली नदी घाटा पर्यंतच्या रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम सुरू
सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड)
नगरपरिषद हद्दीतून प्रभाग क्रमांक 3 मधून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिपत्याखाली असलेला रस्ता जातो. दहिवली जिजामाता उद्यान ते दहिवली नदी घाटापर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत,या रस्त्यावर वाहन चालवणे तर सोडा मात्र चालणेही कठीण झाले आहे.या रस्त्यावरील खड्डे भरावेत अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग-1 कार्यालयाकडे नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी एका पत्राव्दारे केली होती. या मागणीला यश आले असून खड्डे भरण्याचे काम सुरू झाले आहे.
रस्त्यावरील खड्डे चुकवताना वाहनचालकांकडून काही वेळा अपघातही झालेले आहेत, नजीकच्या काळात गणेश उत्सव सण जवळ आला आहे, अशा रस्त्यांवरून गणेश मूर्ती घेऊन जाताना काही नुकसान झाल्यास सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावर राहील
नगर परिषद हद्दीतील ,ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक, नागरिकांनी यांनी नगराध्यक्ष म्हणून माझ्याकडे वेळोवेळी तक्रार केली असून खड्डे भरण्याची मागणी केली आहे,नागरिकांची ही मागणी योग्य आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास नागरिकांकडून जनप्रशोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरीही रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर भरून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी असे निवेदन कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभाग 1 मध्ये नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी दिले होते.
सदर निवेदन दि. 5 ऑगस्ट रोजी देण्यात आले होते याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयाने त्वरित म्हणजे काल दि.7 ऑगस्ट पासून सदर रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे, याबद्दल नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे आभार मानले आहेत.








Be First to Comment