Press "Enter" to skip to content

“रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान” ही संकल्पना राबविणारे

प्राध्यापक हेमंत धायगुडे पाटील यांची शिवशंभू ट्रस्ट नवी मुंबई संपर्क प्रमुख पदी निवड

सिटी बेल लाइव्ह / नवी मुंबई #

शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शिवशंभू ब्लड फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी नवी मुंबई शहर संपर्क प्रमुख पदी शिक्षण, समाजकारण, रक्तदान चळवळीत सक्रीय कार्यरत असणारे प्राध्यापक श्री हेमंत जालिंदर धायगुडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समाजातील गोरगरीब कष्टकरी , दीन-दुबळ्या, वंचित, शेतकरी वर्गासाठी,गरजू रक्तदात्यांसाठी शिवशंभू ब्लड फौंडेशन व हेमंतराजे धायगुडे पाटील ब्लड फौंडेशन वेळोवेळी मदत पोहचवण्यासाठी कार्यरत आहे.
रक्तदान चळवळीत काम करणारी संस्था म्हणजे शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शिवशंभू ब्लड फौंडेशन महाराष्ट्र राज्य या ट्रस्टचे मार्गदर्शक आधारस्तंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले, संस्थापक अध्यक्ष शिवश्री भूषणदादा सुर्वे व संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य श्री आप्पा घोरपडे, परभणी जिल्हा संपर्क प्रमुख उज्ज्वलाताई पाटील, कल्याण तालुका संपर्क प्रमुख शुंभागीताई धायगुडे पाटील तसेच सर्व कमिटी सदस्य हे महाराष्ट्रातील रक्तदात्यांना नेहमी मोफत रक्त मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. “रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान” ही संकल्पना मानून प्राध्यापक हेमंत धायगुडे पाटील यांची नवी मुंबई शहर संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.