सिटी बेल लाइव्ह /कांजुरमार्ग – (पंकजकुमार पाटील )
महाराष्ट्रातील जनता विशेषतः मुंबईत राहणारे चाकरमानी ज्या महाउत्सवाची मोठ्या आनंदाने व उत्साहाने वाट पाहत असते तो गणेशोत्सव सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे . या गणेशोत्सवासाठी दरवर्षी तीन चार महिने आधीच कोकणात जाणाऱ्या रेल्वेचे आरक्षण फुल होते . कधी कधी जादा रेल्वे गाड्या ,एस टी बसेस सोडल्या जातात त्यांनादेखील खच्चून गर्दी होते . मात्र दरवेळेस प्रमाणे यावर्षीची वेगळी परिस्थिती आहे . याला कारण आहे गेले चार पाच महिन्यापासून कोरोनासारख्या महामारीने महाराष्ट्रात केलेला कहर होय. असे असले तरी कोकणवासीय गावाकडे जाण्याच्या तयारीला लागले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरु झालेल्या नाहीत . त्यामुळे गावी जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी एस टी बसेस तर काहीजण खासगी गाड्यांचा आधार घेत आहेत .परंतु अपुऱ्या पडणाऱ्या एसटी बसेस तसेच खासगी वाहनांचा दुपट्ट -तिपटीने वधारलेला भाव ,त्यातच ई पासचा तिढा ( जो लवकर मिळणे मुश्किल ) शासनाच्या इतर जाचक अटी यामुळे मुंबईत राहणारे चाकरमानी चिंताग्रस्त झालेले आहेत . हीच गोष्ट ध्यानात घेऊन कांजुरमार्ग (पुर्व ) येथील माऊली प्रतिष्ठान च्या वतीने व संस्थापक अध्यक्ष मा विठ्ठलशेठ बबन नाकाडे याच्या सामाजिक जाणिवेतून व पुढाकाराने कांजूरमधील कोकण वासियांसाठी माफक दरात बस सेवेची (ई पास सहित ) सोय करण्यात आली आहे .
यामध्ये सावंतवाडी , मालवण, देवगड, रत्नागिरी , खेड असे बस मार्ग असून बस दिनांक ८ ऑगस्ट २०२० पासून सायंकाळी 5:00 वाजता स्टेट बँक , कांजूरमार्ग (पूर्व ) याठिकाणाहून सुटणार आहेत . या सुविधेचा लाभ घेताना प्रवाशांना काही नियम अटी पाळणे आवश्यक ठरणार आहे. यावेळी प्रत्येक बस मध्ये 25 प्रवासी असतील,प्रत्येकास आधारकार्ड झेरॉक्स व मेडिकल दाखला आणावा लागेल, बुकिंग रक्कम रोख स्वरूपात द्यावी लागेल, प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक असेल . मुख्य म्हणजे इ पास देण्याची सुविधा माऊली प्रतिष्ठान कडून करण्यात येणार आहे. या बस सेवेबाबतच्या अधिक माहिती साठी भूषण नेवाळकर -8898138203(सावंतवाडी बस मार्ग ), सचिन हडकर =9594781343 (मालवण बस मार्ग ), रुपेश मगदूम -7718046851(देवगड बस मार्ग ), प्रतीक महाडिक -7718089016 (रत्नागिरी बस मार्ग ) व अतुल खेडेकर -9820474645(खेड बस मार्ग ) यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहिती साठी सिद्धार्थ कदम -7045082424, हरेश राणे -7738037375. माऊली प्रतिष्ठानच्या या सामाजिक कार्याबद्दल संस्थापक- अध्यक्ष विठ्ठलशेठ ब. नाकाडे यांचे कौतुक होत असून कांजूरमधील कोकणवासीय या सेवेसाठी त्यांना धन्यवाद देत आहेत.
Be First to Comment