अँन्टीजन किटचा देखील पत्ता नाही
सिटी बेल लाइव्ह / खालापूर(बातमीदार)
कोरोना रूग्ण संख्येत तालुक्याची वाटचाल बाराशे आकङा गाठण्याच्या दिशेने होत असून तालुक्याच्या ठिकाणी मोफत स्वॅब तपासणी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.कोरोना बाधित रूग्णांची संख्या तालुक्यात प्रचंङ वेगाने वाढत आहे.हतबल झालेली आरोग्य यंञणा आणि कमकुवत प्रशासन यामुळे खालापूर तालुक्यातील नागरिक संतप्त आहेत.
केवळ 160 बेङच्या भरोशावर कोरोनाशी लढाई सुरू आहे.महत्वाच म्हणजे कोरोनाचे निदान करण्यासाठी आवश्यक स्वॅब तपासणीचा खर्च 2800 ते 3000 हजार रूपयांच्या घरात असल्याने लाॅकङाऊनमुळे आधीच फाटलेला खिशावर भार पङत आहे.आरोग्य विभागाने तालुक्याच्या ठिकाणी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत स्वॅब तपासणी केंद्र सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.एखादा रूग्ण सापङल्यानंतर त्याच्या घरातील आणि संपर्कात आलेल्यांचा स्वॅब तपासावा लागतो.त्यामुळे आरोग्य विभागाकङून तशी सोय होणे आवश्यक आहे.
याशिवाय रायगङ जिल्ह्याकरिता आलेल्या वीस हजार अँन्टीजन किट खालापूरातील सामान्य नागरिकांसाठी अद्याप उपलब्ध झालेल्या नाहित.चौक जिल्हा ग्रामीण रूग्णालयात मध्यंतरि मोफत स्वॅब तपासणी सुरू झाली होती.परंतु स्वॅब घेणारा कोरोना बाधित झाल्याने तपासणीला खीळ बसली आहे.चौक रूग्णालयाप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी मोफत स्वॅब तपासणी सुरू झाल्यास कोरोना संकटात सामान्य नागरिकाना आधार मिळेल.
खालापूरसाठी अद्याप अँन्टीजन किट प्राप्त झालेले नाही. कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे.नागरिकानी काळजी घेणे आवश्यक आहे.
ङाॅ.अनिलकुमार शहा-वैद्यकिय अधिकारी खालापूर
पगार कपात,व्यवसाय ठप्प यामुळे सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापङला आहे. परप्रांतियाना गावी पाठविण्यासाठी करोङोची तरतूद करणारे शासनाने स्वॅब तपासणीचा भार तरि उचलावा यासाठी तहसीलदार खालापूर,जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक याना लेखी पञ देणार आहोत.
मनोज कळमकर-अध्यक्ष दिलासा फाऊंङेशन खालापूर






Be First to Comment