Press "Enter" to skip to content

उरणमध्ये ७ पॉझिटीव्ह, १३ जणांना डिस्चार्ज तर एकाचा मृत्यू

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ७ जण सापडले आहेत. तर १३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज एकूण पॉझिटीव्ह ९५९, उपचार करून बरे झालेले ७९९, उपचार घेणारे १२५, मयत ३५ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज चिरले १, सुरुंगपाडा जासई १, कळंबुसरे १, मोरा रोड १, जासई १, नागाव १, धुतुम १ असे एकूण ७ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर उरण सीआयएसएफ ओएनजीसी १, जांभूळपाडा १, मुळेखंड १, मोरा कोळीवाडा १, सोनारी २, डोंगरी १, दिघोडे २, करंजा २ असे एकूण १३ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर धुतुम येथील एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.