सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे)
रोहा तालुक्यातील पिंगळसई गावाचे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप उर्फ आप्पा देशमुख यांची नुकतीच रायगड जिल्हा शांतता समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रदीप देशमुख हे व्यक्तिमत्त्व राजकारण विरहित असून रोहा तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष म्हणून सध्या काही वर्षे कार्यरत आहेत.कुंडलिका नदि आणि भाटे सार्वजनिक वाचनालयाच्या प्रश्नावर सिटीझन फोरमच्या माध्यमातून त्यांनी आजवर काम पाहिले आहे.तर रोह्यातील विविध क्षेत्रातील
प्रश्न असोत त्यांचा सक्रिय सहभाग हा ठरलेलाच.त्यांना असलेल्या सामाजिक कार्याची आवडीमुळे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या शिफारशी वरून त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीचे रोहा सकल मराठा समाज,रोहा सिटीझन फोरम सह त्यांच्या असंख्य चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.






Be First to Comment