Press "Enter" to skip to content

उपजिल्हा कोविड रूग्णालयाला पाणी गरम करण्याच्या १५ इलेक्ट्रिक किटल्या भेट

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक नितीन पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी

सिटी बेल लाइव्ह / पनवेल / प्रतिनिधी #

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक व भाजप पनवेल शहर मंडल सरचिटणीस नितीन जयराम पाटील व जाणीव एक सामाजिक संस्था, पनवेल यांनी कोविड रुग्णालय असलेल्या उप जिल्हा रुगणलाय पनवेल येथे रुग्णांच्या सेवे साठी पाणी गरम करण्या चे १५ इलेक्ट्रिक किटल्या भेट दिल्या. याचा कोविड रूग्णांना खूप फायदा होणार आहे . सदर इलेक्ट्रिक किटल्या गरजेच्या होत्या आणि त्या नगरसेवक नितीन पाटील यांनी पुरवली असल्याने उप जिल्हा रुगणलायचे अधीक्षक डॉ. श्री. नागनाथ यंपल्ले यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी रुग्णालयातील डॉ. विकास कोमपल्ले, परिसेविका ज्योती गुरव तसेच भाजपाचे उमेश ईनामदार, भाजपा सोशल मीडिया सेल संयोजक प्रसाद हनुमंते, युवा मोर्चा जिल्हा सदस्य सुशांत मोहिते, महेश सरदेसाई, प्रसाद कंधारे, समीर शहासने (ओबीसी सेल ), विजय डिसोझा आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.