कोव्हीड योद्धा म्हणून राखी व प्रशस्तीपत्रक देवून सन्मान
सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड)
भाजपा महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंडळ अध्यक्षा स्नेहा गोगटे यांच्या नेतृत्वाने आणि शहर अध्यक्षा सरस्वती चौधरी यांच्या सह आज दि.7 ऑगस्ट रोजी कर्जत शहरात पोलीस ठाणे,उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर व सर्व स्टाफ, नगरपरिषद सफाई कामगार, दुकानदार, भाजी विक्रेते, मेडिकल अशा 80 लोकांचा कोविड योद्धा राखी बांधून आणि गौरव पत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव बघून खूप मानसिक समाधान मिळाले असे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सांगितले,या प्रसंगी तालुका मंडल अध्यक्षा स्नेहा गोगटे,जिल्हा महिला सोशल मीडिया संयोजिका गायत्री परांजपे,शहर अध्यक्षा सरस्वती चौधरी, माजी नगरसेविका बिनीता घुमरे, तालुका सदस्या लीना गांगल,तसेच युवती सुषमा ढाकणे आदी उपस्थिती होत्या.






Be First to Comment