राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साधला आमदार अनिकेत तटकरेंशी आॅनलाईन संवाद
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
येणाऱ्या काळखंडात रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री कु. आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या आशिर्वादाने रोहा तालुका विद्यार्थी संघटना मोठ्या जोमाने कार्य करुन संपूर्ण जिल्ह्यातही ही संघटना सर्वात मजबूत आणि समाजसेवा संघटना होइल असा दृढ निर्धार राष्ट्वादी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अनिकेत तटकरे यांच्याशी गुगल मीट वर नुकत्याच झालेल्या आॅन लाईन मीटिंग मध्ये व्यक्त केला.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच रा.कॉ. विद्यार्थी संघटना कोकण प्रमुख किरण शिखरे यांच्या अध्यक्षतेखाली विध्यार्थी संघटनेची ऑनलाईन मिटिंगचे आयोजन ५ आॅगस्ट रोजी करण्यात आली होते. त्यावेळी राष्ट्वादी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ. अनिकेत तटकरे यांना ही ग्वाही दिली. दरम्यान ही ऑनलाईन मिटिंग रोहा तालुका विद्यार्थी संघटनेला संघटनेच्या वाढीसाठी नक्कीच प्रेरणादाई ठरेल असा आत्मविश्वास यावेळी रोहा तालुका अध्यक्ष कु. अक्षय अनिल नागोठणेकर यांनी व्यक्त केला आहे.
या मिटिंग मध्ये मार्गदर्शन करताना आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी आयोध्येमध्ये होत असलेल्या श्री राम मंदिर भूमी पुजनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या. त्यांनी राम चरणी कोरोनाचे सावट लवकरच दूर होण्यासाठी साकडे घातले व म्हणाले की, येणाऱ्या काळखंडा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटने मार्फ़त अनेक विद्यार्थी हिताच्या कार्यक्रम राबविण्यात यावेत. त्यास माझे नक्कीच सहकार्य असेल असेही आ. तटकरेंनी सांगितले. या आॅनलाईन मीटिंगला रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि विद्यार्थी संघटना पदाधिकारी उपस्थित होते.






Be First to Comment