Press "Enter" to skip to content

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :

उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा शनिवार दि. ८ आॅगस्ट रोजी होणारा रायगड जिल्हा दौरा जाहीर करण्यात आला आहे.

आदिती तटकरे यांच्या या दौ-याचा कार्यक्रम खालील प्रमाणे.

शनिवार, दि. ८ ऑगस्ट, रोजी, सकाळी ११.३० वा., सुतारवाडी (ता.रोहा) येथून गोरेगाव, ता.माणगावकडे प्रयाण. दुपारी १.०० वा. गोरेगाव येथे आगमन व निसर्गचक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या महाविद्यालयांना खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टमार्फत संगणक व मदत वाटप. स्थळ :- दोशी वकील कला महाविद्यालय, गोरेगाव, ता.माणगाव, जि.रायगड. दुपारी २.३० ते ३.०० वा. राखीव. दुपारी ३.०० वा. गोरेगाव येथून खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासमवेत मुंबईकडे प्रयाण.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.