Press "Enter" to skip to content

केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांची पेण येथे जनसंवाद यात्रा

वर्षभरासाठी साठ हजार कोटी निधी राखीव – केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆

देशाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचा मागील चार दिवस कोकण दौरा सुरु असून त्यांनी आज पेण शहरातील रोहिदास नगर आणि तालुक्यातील वाशी गावातील नागरिकांशी संवाद साधला हा संवाद साधतेवेळी देशाचे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी जलशक्ती खात्याच्या माध्यमातून वर्षभरासाठी तब्बल साठ हजार कोटी रूपयांची भरघोस तरतूद केली आहे त्याचा पुरेपूर फायदा नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी या संवाद यात्रेत माजी मंत्री तथा विद्यमान आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्षा प्रितम पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जनार्दन जाधव, रोहीदास समाजाचे अध्यक्ष भरत साळवी, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, नायब तहसीलदार नितिन परदेसी, आरोग्य अधिकारी डॉ अपर्णा खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत केंन्द्र शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत प्रधानमत्र्यांनी गोरगरीब आर्थिक दुर्बल घटकासाठी या योजना आणल्या आहेत देशातील हा घटक प्रगतीपथावर गेला पाहिजे हा त्यांचा उद्देश आहे. माझे भाग्य आहे की त्यांनी मला रायगडच्या या माती जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी पाठविले आहे.त्यानुसार कोकणातील जनतेशी मी संवाद साधला आहे. मागील चार दिवस कोकण दौरा सुरु आहे. जलशक्ती विभागाच्या माध्यमातून स्वच्छता, पाणी यासारख्या असंख्य योजना राबविण्यासारख्या आहेत.त्यामुळे निधी उपलब्ध केला आहे त्याचा पुरेपूर वापर आपण करणे गरजेचे असून देशाने कोरोना काळात कोट्यावधी नागरिकांची लसीकरण केले ही प्रधानमंत्र्यांनी व्यवस्था पूर्ण करून जवळपास दीडशे देशांना आपली लस पुरविण्याचे काम केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या संवाद यात्रेदरम्यान त्यांनी शहरातील नगरपालिका महिला सफाई कर्मचारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.