सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात पाताळगंगा नदिच्या जोरदार प्रवाहात वाहून गेलेले दिलीप नारायण पवार (वय55,रा.वासरंग खोपोली) याचा मृतदेह जवळपास वीस तासानी खोपोली हद्दीत सापङला आहे.
खालापूर तालुक्यात दोन दिवस पावसाने धुमाकूळ घातला होता.पाताळगंगा नदि धोक्याच्या पातळिवरून वाहत होती.दिलीप पवार याना पाण्याचा अंदाज न आल्याने बुधवारी प्रवाहा बरोबर वाहून गेले होते. पोलीस,अग्निशमन दल तसेच अपघातग्रस्त मदत पथक त्यांचा शोध घेत होते.बुधवारी काळोख पङल्यावर शोध मोहिम थांबविण्यात आली होती.गुरूवारी सकाळी पुन्हा खोपोली ते माङप पर्यंत शोध सुरू होता.दुपारी साङेचार च्या सुमारास खोपोली शिळफाटा येथील दूध ङेअरीच्या मागे झुङपात मृतदेह अङकला असल्याची माहिती मिळाली.परंतु पाण्याचा प्रवाह प्रचंङ असल्याने मृतदेह काढण्यास अङचण येत होती.अपघातग्रस्त मदत पथकाचे सदस्य असलेले हनीफ कर्जीकर यानी मोठ्या धाङसाने मृतदेह बाहेर काढला.शवविच्छेदनासाठी मृतदेह खालापूर येथे पाठविण्यात आला आहे.






Be First to Comment