मुंबई – गोवा 66 महामार्गावर
मनसेचे चक्का जाम आंदोलन
सिटी बेल ∆ नागोठणे ∆ याकुब सय्यद ∆
मुबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन एक तप पूर्ण झाले. तरीही पळस्पे ते इंदापूर महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर अक्षरशः खड्यात रस्ता शोधावा लागत असल्याने वाहनचालकांची हालत अत्यंत खराब झाली आहे. याचा त्रास पुन्हा एकदा गणेश भक्तांना होणार आहे. त्यामुळे महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी मनसे ने केली होती. मात्र तरी देखील प्रशासनाने दखल न घेतल्याने मनसे ने चक्का जाम आंदोलन छेडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोहा तालुका शाखेच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आले.
मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड, उपाध्यक्ष अमोल पेनकर,
मनसेचे रोहा तालुका माजी उपाध्यक्ष हरिश्चंद्र तेलंगे, तालुका महिला आघाडी प्रमुख दिपश्री घासे, तालुका सरचिटणीस साईनाथ धुळे आदी या वेळी उपस्थित होते.

यावेळेस जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड म्हणले की, रस्त्यामधील खड्डे आणि खड्डयातील रस्ता यांच्यातील गुंता सोडवताना असंख्य बळी या महामार्गाने घेतलेले असुनही प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत. कोकणचा सर्वात मोठा सण गणपती उत्सव तोंडावर आलेला असुन रस्त्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांना खड्ड्यातूनच बाप्पा पर्यंत पोहोचावे लागणार आहे.
महामार्गाच्या कामाला सुरुवात होऊन एक तप उलटल , परंतु या बारा वर्षात जनता व प्रवाशांना शारिरीक व मानसिक त्रासाशिवाय काहीच मिळालेले नाही. त्यामुळे राज्य शासन, महामार्ग प्राधिकरण यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक जनता. महामार्गावरील प्रवाशी व जिल्हयातील सर्व स्थानिक वाहतूक संघटना यांना घेऊन आम्ही आज चक्क जाम केले आहे असे जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी पुढे सांगितले.








Be First to Comment