युवासेना राष्ट्रीय सह सचिव तथा विस्तारक रुपेश पाटील यांचा ४० राज्य कार्यकारणी पदाधिकार्यांसह आदित्य ठाकरेंना जय महाराष्ट्र !!
सिटी बेल ∆ पनवेल ∆
गेल्या काही दिवस सातत्याने शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे सेनेला झटके दिले जात आहेत. राज्यभरातून आमदार आणि खासदार शिंदे गटाकडे जात असताना आता आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेला सुद्धा आता शिंदे गटाकडून भगदाड पाडले आहे.
रायगड जिल्ह्यातील आदित्य ठाकरेंसाठी अगदी सुरुवातीपासून युवसेनेची धुरा सांभाळणारे राज्य विस्तारक व सह सचिव रुपेश पाटील यांनी आपल्या समवेत राज्य कार्यकारणी म्हणून सहसचिव व विस्तारक, युवतीसेना, जिल्हा कार्यकारणी व अनेक तालुका शहर पदाधिकारी यांज समवेत काल शिंदे गटाला पाठिंबा देऊन आदित्य यांच्या युवासेनेला झटका दिल्याचे मानले जात आहे.
काल मुख्यमंत्री निवासस्थानी 40 पेक्षा जास्त विस्तारक व सहसचिव यांची प्रेस कॉन्फरन्स पार पडली, ह्यावेळी प्रत्येक पदाधिकारी यांनी आपल्याला मिळालेली वागणूक व झालेले राजकीय अत्याचार ह्याज बाबत आदित्य ठाकरे व युवासेना सचिव यांच्यावर अनेक आरोप लावले.
ह्यावेळी रुपेश पाटील ह्यांनी बोलतांना स्पष्ट केलं की, त्यांनी सुरवातीपासून ४१ आंदोलने केली, ११ केसेस अंगावर घेतल्या, कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि युवासेना वाढवण्यासाठी योगदान दिले. युवासेना चे पहिले स्फुर्तीगीताची निर्मिती, शिवसेनेवर केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी स्वतः व्यंगचित्र केली, शिवसेना माझ्यात आहे सारखे कॅम्पेन केली, स्वखर्चाने राज्यभर दौरे करून सेना वाढवली पण अचानक आदित्य ठाकरे यांचे भाऊ वरूण सरदेसाई यांना पुढे आणले गेले आणि त्यांनी दडपशाही सुरू केली असा आरोप ह्यावेळी रुपेश पाटील यांनी लावला.
मात्र नेत्यांची मुलं आणि जवळचे मित्र ह्यांना वरूण सरदेसाई यांनी १० वर्षे काम केलेल्या अनुभवी पदाधिकारी यांच्या समवेत पदे दिली.मित्रांना जवळ केले. अनुभव पेक्षा मैत्री आणि चमकोगिरी पाहिली गेली आणि मुळे ग्रामीण भागातील तसेच सामान्य परिवारातील पदाधिकारी नाराज झाला असे ह्यावेळी रुपेश पाटील यांनी सांगितले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ही वेळ देणे बंद केले, संवाद बंद केला आणि सगळी सूत्रे वरूण सरदेसाई यांज कडे दिल्याने ही परिस्थिती आल्याचे ह्यावेळी सर्वांनी आरोप लावले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्य करण्याचे आणि त्यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.
लवकरच ह्या सर्वांना घेऊन नवीन युवासेना राज्य कार्यकारणी स्थापन करण्यात येणार असून जिल्हा निहाय कार्यकारणी सुद्धा जाहीर करण्यात येणार असल्याचे ह्यावेळी सांगण्यात आले.
Be First to Comment