पेण को ऑप अर्बन बँक ठेवीदारांना ५ लाख रुपये देऊन दिलासा द्यावा
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची कर्जत मधील भाजप नेते सुनिल गोगटे यांनी भेट घेऊन 12 वर्षांपासून दीड लाख पेण को ऑप बँक खातेदार व ठेवीदारांचे पैसे अडकून आहेत, ते पैसे लवकरात लवकर परत देण्याची प्रकिया करावी ही विनंती करून त्यांना निवेदन देण्यक्त आले.
आपल्या कष्टाचे पैसे मिळतील या आशेवर अनेकांचे मृत्यू झाले आहेत,अनेक ठेवीदार 75 वर्षाचे वरील आहेत,त्याच्या ठेवीवरील व्याजावर त्यांचा उदरनिर्वाह होतं असे. परंतु बँक बुडीत निघाल्या पासुन त्यांची अवस्था फार वाईट आहे. अनेक ठेवीदार धसक्याने 4मयत सुद्धा झाले आहेत. मोलमजुरी करून भविष्यासाठी जमा केलेल्या पुंजीवर डल्ला मारून बँकेचे विश्वस्त मोकाट फिरत आहेत. अनेकांचे उदयोग धंदे चौपट झाले, काहींची लग्न होऊ शकली नाहीत. अनेक व्यक्ती खासगीत येऊन व्यथा मांडत आहेत, रोज खर्चाला सुद्धा पैसे नाहीत, काय करावे सुचत नाही,आत्महत्या करण्याची हिम्मत नाही म्हणुन नाहीतर जीवन संपविले असते असेही सांगतात. म्हणूनच सर्व बाबींचा सहानभूती पूर्वक विचार व्हावा असे सुनिल गोगटे यांनी सांगितले.
संपूर्ण निवेदनाचा गांभीर्याने ऐकून घेतले आणि हे प्रकरण खूपच गंभीर आहे असे म्हणाले. त्यावर कराड यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आपण नक्की मार्ग काढू असे सांगितले. 5 लाख रुपये देण्याच्या प्रक्रियेसाठी काही गोष्टीच्या अडचणी आहेत, त्यावर रिझर्व बँक आणि इतर संबंधिताशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय करून ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे देऊ असे आश्वासन दिले.
याप्रसंगी सर्वेश गोगटे,अक्षय सर्वगोड, राहुल मसणे उपस्थित होते.
Be First to Comment