सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
खोपोली ∆
नगरपालिका प्रशासनाने नुकतीच पाणीपट्टी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला, याबाबत त्यांनी विविध वर्तमानपत्रात पाणीपट्टी दरवाढीचे जाहिरात प्रसिद्ध केली या पार्श्वभूमीवर खोपोली भारतीय जनता पार्टीने या पाणीपट्टी दरवाढीस तीव्र विरोध दर्शवला असून, खोपोली प्रशासनाने ही पाणीपट्टी तात्काळ मागे घेण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सोमवारी खोपोली भाजप शिष्टमंडळाने मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप धुरे यांना दिले आहे.
भाजप तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात गेल्या दोन वर्षापासून करोना साथीच्या रोगाने नागरिक त्रस्त झाले असून ,त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे, त्यामुळे सध्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती डामाडौल आहे या करोना साथीच्या रोगा मुळे अनेकांच्या नोकऱ्या गमावल्या, अनेक संसार रस्त्यावर आले तर ,व्यवसायीक आजही आर्थिक संकटातून वर आलेला नाही अशा परिस्थितीत खोपोली पालिका प्रशासनाने पाणीपट्टी दरवाढीचा निर्णय घेतला तो अयोग्य आहे त्याचा प्रशासनाने फेर विचार करावा असे निवेदना स्पष्ट करण्यात आले आहे.
या शिष्टमंडळात खोपोली भारतीय जनता पार्टी सरचिटणीस हेमंत नांदे महिला मोर्चा शहराध्यक्ष शोभाताई काटे युवा शहराध्यक्ष अजय इंगुलकर महिला मोर्चा सरचिटणीस अश्विनी अत्रे, उपाध्यक्ष अपर्णा साठे, वैद्यकीय सेलचे विकास खुरपडे, सागर काटे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी निवेदन स्वीकारून मुख्याधिकारी अनुप धुरे यांनी याबाबत जरूर विचार केला जाईल असे आश्वासन दिल्याचे नांदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
Be First to Comment