Press "Enter" to skip to content

वावोशी विद्यालयाचा दहाविचा निकाल 87.31टक्के,यशाची परंपरा कायम

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 

छञपती विद्यालय व ज्युनिअर काॅलेज वावोशीचा दहाविचा निकाल  87.31 टक्के लागला असून गुणवत्ता पूर्ण निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.तालुक्यातील छत्तीशी विभाग असलेला वावोशी परिसरातील छञपती विद्यालयात खेङेगाव ,दुर्गम भागातील विद्यार्थी याना शिक्षणाची गंगोञी आहे.

यंदा 134विद्यार्थी दहविच्या परिक्षेला बसले होते.त्यापैकी 117विद्यार्थी उत्तीर्ण झाले.सौरभ आखिलेश सिंग हा विद्यार्थी 89.20 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला.व्दितीय आलेला शुभम सदाशिव मोरे याला 84.60 टक्के गुण मिळाले.तर धनश्री भगवान इंगळे 83.60 टक्के गुण मिळवून शाळेत तिसरी आली.यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक,शिक्षकवृंद व ग्रामस्थांकङून अभिनंदन करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.