सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे
सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक अथवा राजकीय क्षेत्र असो अगदी हिरीरिने सहभागी होऊन समजाप्रति निष्टेने समाजकार्य करणारे सारसई दुर्गंम भागातील संतोष भाऊ शिंगाडे यांची यशवंत सेनेच्या पनवेल तालुका प्रमुखपदावर निवड करण्यात आली आहे. शिंगाडे हे समाजाची घडी जुलविण्यासाठी अत्यंत तळमळीने आणि चिकाटिने धडपड करीत आहेत.समाजाच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे वृक्षारोपण त्याचप्रमाणे गरजवंत घटकास वेळोवेळी मदतीला हातभार लावणे अशी समजाउपयोगी काम नेहमी करत असतात.त्यामुळे नुकत्याच संपन झालेल्या एका विशेष बैठकीत यशवंत सेना महाराष्ट्र पनवेल तालुका प्रमुख पदि संतोषभाऊ शिंगाडे यांची सर्वानुमाते निवड करण्यात आली आहे.पुढील काळात ते आपल्या अंगीकृत असलेल्या गुणाने समाजाला वेगळ्या दिशेने वाटचाल करतील असा आशावाद यशवंत सेनेचे कोकण विभाग प्रमुख राजूजी बोडेकर याने व्यक्त केला आहे.






Be First to Comment