कांजुरमार्ग येथे वॉर्ड क्रं. ११७ मधील भाजपा महिला मोर्चा कडून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा
सिटी बेल लाइव्ह / कांजुरमार्ग /पंकजकुमार पाटील
ईशान्य मुंबई चे खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ रजनी रविंद्र कदम ई मुं जिल्हा उपाध्यक्ष (महिला मोर्चा) यांच्या मार्फत वार्ड क्रं ११७ कांजूरमार्ग (पुर्व) येथे कांजूरमार्ग पोलिस बंधु व भगिनींना आणि महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या या कोरोना योद्धायांना (REAL CORONA FIGHTERS) राखी बांधुन रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. या सर्वांप्रती आदर व्यक्त करून कोरोना च्या लढ्यात निभावत असलेल्या कर्तव्याबद्दल भाजपा महिला मोर्च्याकडून आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी सोबत सौ प्रेरणा सरवणकर (वार्ड अध्यक्ष), ज्योती राणे, अस्मिता चव्हाण, प्राची ढोले, साक्षी कावले, प्रणाली जाधव या महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.तसेच श्री. रविंद्र कदम - ई.मुं. जिल्हा उपाध्यक्ष, श्री विरेंद्र महाडिक - वार्ड अध्यक्ष ११७, श्री अभिषेक ढोले- युवा मोर्चा सचिव (वि.वि.), अरूण महाडीक, मधुकर पाखरे, समुद्रे काका, अशोक खेडेकर, सुर्वै काका, यांनी देखील सहभाग घेतला









Be First to Comment