स्टार हेल्थ अल्लाइड इन्शुरन्स को. लि. यांचे सौजन्य
सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रशांत पोतदार)
पेण तालुक्यातील ग्रामीण भागात स्टार हेल्थ अल्लाइड इन्शुरन्स को. लि. यांच्या सौजन्याने देण्यात आलेल्या ५०० मास्कचे वाटप ग्रामीण भागात घरो घरी जाऊन सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी केले.पेण येथील सह्याद्री प्रतिष्ठानने समाजातिल गरजूंना या कोरोना विषाणूच्या संकटात मदतीची हात दिला.
सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्य पाहुन अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत.पनवेल येथील स्टार हेल्थ अल्लाईड इन्शुरन्स कंपनीच्या शाखेने हि प्रतिष्ठान करत असलेले सामाजिक काम पाहुन मदतीचा हात दिला.दुर्गसेवक महेश शेवडे यांच्या सहकार्याने पनवेल ब्रँच मॅनेजर मेहबूब शेख आणि डेव्हलपमेंट ऑफिसर दिनेश शेट्टी यांस कडून सह्याद्री प्रतिष्ठानला ५०० मास्क भेट देण्यात आले.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान पेण तालुका अध्यक्ष रुपेश कदम, उपाध्यक्ष आनंद निंबरे, गिरिजात्मक साळवी, सुभाष टेंबे व महेश शेवडे, सुधीर पाटील, निखिल आवास्कर, विजय उघडे, संजय तिवले,आदिनी पेण तालुक्यातील बोरगाव व कासमाळ येतील परिसरातील ग्रामीण भागात मास्कचे वाटप केले.






Be First to Comment