पत्रकार राजेंद्र जाधव यांना पितृशोक
सिटी बेल • कोलाड • कल्पेश पवार •
रोहा तालुक्यातील निवी गावचे रहिवासी पत्रकार राजेंद्र जाधव यांचे वडील मारुती भिवा जाधव, वय-८६ वर्ष यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले.
मारुती भिवा जाधव हे वारकरी साम्रादायिक होते. त्यांचा स्वभाव प्रेमळ आणि मनमिळावू होते. त्यांच्या जाण्याने फार मोठे दुःख जाधव परिवारावर ओढवले आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कै.मारुती जाधव हे वयोवृद्ध व ह. भ. प असल्याने त्यांना समाजात व कुटुंबात मानसन्मान व आदर होता.
शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या जाधव यांनी आपल्या सहा मुलांच्या संगोपनासाठी जीवाची पराकाष्ठा करत मोठे केले. मुलांचे शिक्षण, लग्न समजदार मुलांनी आपल्या स्वकष्टावर करीत असताना मुलांना चांगले मार्गदर्शन केले. आज ही कुटुंब आपआपल्या कुटुंबात सुखी समाधानाने जगत आहेत.
मारुती जाधव यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परीवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शनिवारी ९ एप्रिल रोजी तर उत्तरकार्य मंगळवारी १२ एप्रिल रोजी राहत्या घरी निवी येथे होणार आहेत.








Be First to Comment