सिटी बेल • कोलाड • विश्वास निकम •
रोहा तालुक्यातील पुगांव गावच्या विमल रामचंद्र देशमुख यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वभावाने त्या सर्वाना परिचित होत्या.तर समाजकार्यात त्यांचा नेहमी सहभाग होता.
त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील असंख्य नागरिक तसेच समस्त पुगांव ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यांचा मुलगा प्रविण देशमुख हा समाज कार्यात नेहमी सक्रिय असून ते पुगांव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ही होते.तसेच आमदार रविशेठ पाटील व सामाजिक कार्यकर्ते रविंद्र तारू तसेच असंख्य मान्यवरांनी त्यांच्या निवास्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाची सांत्वन पर भेट घेतली.त्यांच्या पक्ष्यात तीन मुलगे, एक मुलगी,सुना,पुतणे,नातवंडे व मोठा देशमुख परिवार आहे. विमल देशमुख यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.१/४/२०२२ तर उत्तरकार्य विधी सोमवार दि.४/४/२०२२ रोजी त्यांच्या पुगांव येथील निवस्थानी होणार आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे.








Be First to Comment