सिटी बेल • गोवे-कोलाड • विश्वास निकम •
रोहा तालुक्यातील झोळांबे येथील धर्मा नामदेव म्हात्रे यांचे वयाच्या ७६ वर्षी दुःखद निधन झाले आहे.
भातसई झोळांबे परीसरात नोकरदार सह कष्टकरी शेतकरी म्हणुन धर्मा नामदेव म्हात्रे यांची ओळख होती.वयाच्या १८ व्यावर्षी स्टेट बँक ऑफ इंडिया रोहा शाखेत नोकरीला सुरवात केली.६० व्या वर्षी बॅंकेच्या नोकरीतून सेवावृत्ती झाले.
स्टेट बॅंकेत नोकरी करीत असताना शेतीकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केले नाही.शेतीसह दुग्ध व्यवसाय चांगल्या पद्धतीने त्यांनी केले आहे. कष्टकरी, अपार मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिले.त्यांच्या जाण्याने म्हात्रे कुटुंबात पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या पश्चात एक भाऊ,तीन मुले,एक मुलगी,पुतणे,नातू असा परिवार आहे.








Be First to Comment