९१.००% गुण मिळवून हर्षल मोरे प्रथम
सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
मार्च २०२० या शैक्षणिक वर्षाचा एस.एस.सी.परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून रोहे तालुक्यातील कोलाड विभागात इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या एम.पी.एस.एस.स्कूलने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत १०० % निकाल लावला आहे.
या स्कूलमध्ये प्रथम क्र.हर्षल सागर मोरे ९१.००%,द्वितीय क्र.रिया संतोष जांभळे ०९.८०%,तुतीय क्र.म्रुदूला चंद्रकांत वरखले ८९.००% तर चतुर्थत्रव पंचम क्र.पार्थ संदीप लोखंडे ८४.६०% व दर्शन संदीप कसबले ८४.००% यांनी अनुक्रमे पटकावला आहे.
विद्यार्थी वर्गानै मिळविलेल्या या यशाबद्दल चेअरमन रमेश महाडिक, व्हा.चेअरमन सुनील महाडिक,सचिव तथा गणित शिक्षक बी.जी.सय्यद, मुख्याध्यापिका वैशाली महाडिक यांच्यासह सहा.शिक्षिक उत्कर्षा घोसाळकर, रसिका चं.सानप,उन्नती बाईत,रसिका आर.सानप,प्रतिक पालांडे,महेश मरवडे,अनघा घोसाळकर व अन्य सर्व शिक्षकव्रुंद तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी तसेच परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.






Be First to Comment